द्रव्याचे मोजमाप

प्रस्तावना

views

6:21
पदार्थाच्या लहानात लहान कणाला रेणु असे म्हणतात. ज्या पदार्थाच्या रेणुमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात, त्या पदार्थांना मूलद्रव्ये असे म्हणतात. मूलद्रव्यांचे विघटन करून वेगळा पदार्थ मिळत नाही. मुलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने संयुगे तयार होतात. द्रव्य हे लहानात लहान कणाने बनलेले असून या कणांना अणू असे म्हणतात व हा अणू कडक आणि भरीव असा गोळा आहे. हा द्रव्याचा लहानात लहान घटक आहे व त्याचे विभाजन करता येत नाही. डाल्टनने हा अणुसिद्धांत 1803 मध्ये मांडला व त्यांनी हे कण अदृश्य व अभेद्य असतात हे स्पष्ट केले. त्यांच्या अणुसिद्धांतामधील महत्त्वाचे तत्व म्हणजे पदार्थाचे वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू एकमेकांशी जोडून संयुगांचे रेणु तयार होतात. पदार्थामध्ये रायायनिक बदल होत असताना पदार्थाचे संघटन बदलते. म्हणजेच त्याचे मूळ गुणधर्म बदलतात. या बाबतीत 18 व्या व 19 व्या शतकातील शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग केले. हे प्रयोग करत असताना त्यांनी वापरलेल्या व तयार झालेल्या पदार्थांचे अचूक मोजमाप केले. डाल्टन, थॉमसन, व रूदडफोर्ड या शास्त्रज्ञांनी पदार्थाच्या व अणूच्या संरचनेचा अभ्यास केला रायायनिक संयोगांचे नियम शोधून काढले. डाल्टनचा अणुसिद्धांत आणि रायायनिक संयोगाचे नियम यांच्या आधारे वैज्ञानिकांनी विविध संयुगांची रेणूसूत्रे लिहिली. संयुगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा आणि अणूंची संख्या यांच्या साहाय्याने संयुगाचे केलेले लेखन म्हणजे रेणूसूत्र होय. आता आपण माहीत असलेल्या रेणूसूत्रांच्या आधारे रायायनिक संयोगाचे नियम पडताळून पाहणार आहोत.