द्रव्याचे मोजमाप

मोलची संकल्पना

views

3:15
आता आपण मोलची संकल्पना समजून घेऊ या. समान संख्येने रेणु घ्यायचे असेल तर समान वजनाच्या राशी घेऊन चालणार नाही. मूलद्रव्ये किंवा संयुगे जेव्हा रायायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात त्या वेळेस अणु व रेणुंमध्ये अभिक्रिया होत असते. त्यामुळे त्यांच्या अणु व रेणूंची संख्या माहिती असावी लागते. मात्र रासायनिक अभिक्रिया होताना अणु व रेणु मोजण्यापेक्षा हाताळता यावे अशा राशी मोजून घेणे सोयीचे असते. यासाठी ‘मोल’ या संकल्पनेचा वापर केला जातो. मोल ही अशी राशी आहे की, जिचे ग्रॅममध्ये व्यक्त केलेले पदार्थाचे अणुवस्तुमान त्या पदार्थाच्या रेणुवस्तुमानाच्या डाल्टनमधील मूल्याएवढेच असते. म्हणजेच त्याला आपण पदार्थाचा “एक मोल” असे म्हणतो. पदार्थाच्या मोलची संख्या (n) = (पदार्थाचे ग्रॅममधील वस्तुमान)/(पदार्थाचे रेणुवस्तुमान )