द्रव्याचे मोजमाप

मूलके

views

3:52
आता आपण “मूलके” या घटकाविषयी माहिती घेऊ. आयनिक बंध असणाऱ्या संयुगाचे दोन घटक असतात. त्यातील कॅटायन हे धनप्रभारित (+) असतात. तर अॅनायन हे ऋणप्रभारित घटक असतात. म्हणजेच धनप्रभारित (कॅटायन) किंवा ऋणप्रभारित (अॅनायन) हे घटक स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेतात त्यांना ‘मूलके’ असे म्हणतात. कॅटायन मूलकांची जोडी हायड्रॉक्साइड हया अॅनायनरूपी मूलकासोबत झाली की, विविध आम्लारी तयार होतात. त्यामुळेच कॅटायनांना आम्लारीधर्मी मूलके असे म्हणतात. उदा. Na+सोडियम आयन व Ca+ कॅल्शिअम. पोटॅशियम k+, मॅग्नेशियम Mg2+, अॅल्युमिनियम AL3+ ही धनमूलके आहेत यांनाच आपण कॅटायन किंवा आम्लारीधर्मी मूलके असे म्हणतो. विविध आम्लारींमधील फरक या मूलकामुळे स्पष्ट होत असतो. या उलट अॅनायनरूपी मुलकांची जोडी हायड्रोजन आयन हया कॅटायनरूपी मूलकाबरोबर झाली की विविध प्रकारची आम्ले तयार होतात. उदा. हायड्रोक्लोरिक आम्ल HCL, हायड्रोजन ब्रोमाइड HBr. यांना अॅनायन किंवा आम्लधर्मी मूलके असे म्हणतात.