द्रव्याचे मोजमाप

अणूचे वस्तुमान (Mass of Autom)

views

3:37
अणूच्या आकाराविषयी माहिती करून घेतल्यावर आता आपण अणूच्या वस्तुमानाविषयीची माहिती पाहू या. मूलद्रव्याच्या अणुतील केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉन (P) आणि न्यूट्रॉन (n) (p+n) यांच्या एकूण संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक (Automic Mass Number) असे म्हणतात. प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे अणुकेंद्रकातील मूलकण (Nucleon न्युक्लियॉन) असे संबोधतात. अणु हा अतिशय सूक्ष्मकण असल्यामुळे त्याचे वस्तुमान कसे ठरवावे? असा प्रश्न शास्त्रज्ञांनाही पडला होता. 19 व्या शतकातील वैज्ञानिकांना अणुवस्तुमान अचूकपणे मोजणे शक्य नसल्यामुळे ‘अणुचे सापेक्ष वस्तुमान’ ही संकल्पना पुढे आली. त्यामुळे अणुचे वस्तुमान मोजण्यासाठी एका संदर्भ अणुची गरज होती. हायड्रोजनचा अणु सर्वात हलका असल्यामुळे सुरवातीला हायड्रोजन वायूचा अणु संदर्भ अणु म्हणून निवडला गेला. ज्याच्या केंद्रकांत केवळ एक प्रोटॉन आहे, अशा हायड्रोजन अणुचे सापेक्ष वस्तुमान हे (1) असे ठरवण्यात आले. त्यामुळे सापेक्ष अणुवस्तुमानाचे मूल्य हे अणुवस्तुमानांइतके म्हणजेच p+n असे झाले. म्हणजेच अणुवस्तुमानांक (A) हा केंद्रकातील प्रोटॉन(p) आणि न्यूट्रॉन(n) यांच्या एकूण बेरजेएवढा असतो. A = p+n