द्रव्याचे मोजमाप

रेणूवस्तुमानाची संकल्पना

views

5:12
आता आपण रेणु वस्तुमानाची संकल्पना याविषयी माहिती करून घेऊ या.“एका रेणुमधील सर्व अणुवस्तुमानांची बेरीज म्हणजे त्या पदार्थाचे रेणूवस्तुमान होय”. रेणूवस्तुमानसुदधा डाल्टन (u) या एककातच व्यक्त केले जाते. जसे कार्बनडॉयऑक्साइडचे रेणुवस्तुमान हे 44 आहे. तर पाण्याचे रेणूवस्तुमान 18 इतके आहे.अणुवस्तुमाने :- हायड्रोजन (H) = 1, ऑक्सिजन (O) =16, नायट्रोजन (N) = 14, कार्बन (C) = 12, सल्फर (S) = 32, कॅल्शिअम (Ca) =40, सोडिअम (Na)=23, क्लोरिन (Cl) =35.5, पोटॅशिअम (K)=39, मॅग्नेशिअम (Mg) = 24, अॅल्युमिनिअम (Al)= 27, फॉस्फरस (P) = 31रेणुसुत्रे :- सोडिअम क्लोराइड (Nacl) , मॅग्नेशिअम क्लोराइड (Mgcl2), पोटॅशिअम नायट्रेट (KNO3), हायड्रोजन पेरॉक्साइड (H2O2), अॅल्युमिनिअम क्लोराइड (Alcl3), कॅल्शिअम हायड्रॉक्साइड Ca(OH)2, मॅग्नेशिअम ऑक्साइड MgO, सल्फ्युरिक अॅसिड H2SO4, नायट्रिक अॅसिड HNO3, सोडिअम हायड्रॉक्साइड NaOH.