द्रव्याचे मोजमाप

अणू आकार (Size of Autom )

views

4:24
आता आपण अणूविषयीची माहिती पाहूया. अणूविषयी अनेक शास्त्रज्ञांनी आपले मत मांडले आहे. अणू हे अतिशय सूक्ष्म असतात. प्रोटॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन हे तिन्ही अणूचे मूलकण असून त्यातील प्रोटोन व न्यूट्रॉन अणूच्या केंद्रकामध्ये असतात. त्यांना एकत्रितपणे न्युक्लियॉन म्हणतात. प्रोटॉन हे धनप्रभारित, इलेक्ट्रॉन ऋणप्रभारित तर न्यूट्रॉन हे प्रभाररहित असतात. अणूचा आकार हा त्याच्या त्रिज्येवरून ठरत असतो. स्वतंत्र अणूमध्ये अणूची त्रिज्या म्हणजे अणूचे केंद्रक व बाह्यतम कक्षा यांमधील अंतर होय. अणूची त्रिज्या ही नॅनोमीटरमध्ये व्यक्त करतात.