भारत १९६० नंतरच्या घडामोडी Go Back १९६० चे दशक भाग १ views 3:13 १९६० चे दशक भाग १:- पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून लालबहादूरशास्त्री यांनी शपथ घेतली. शास्त्री पंतप्रधान असताना भारत – पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून पुन्हा एक युद्ध झाले. अजूनही याच मुद्द्यांवरून या दोन देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. त्यावेळी सोव्हिएत युनियनने (आजचा रशियाने ) दोन्ही देशांत मध्यस्थी करून शांतता राखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सीमेवर उभे राहून देशाचे रक्षण करणारा जवान व देशातील लोकांसाठी अन्नधान्य पिकवून त्यांना जिवंत ठेवणारा किसान (शेतकरी) यांचे मह्त्त्व जाणून शास्त्रींनी “जय जवान, जय किसान” ही घोषणा दिली. या घोषणेद्वारे जवान व किसान किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले. १९६६ मध्ये ताश्कंद याठिकाणी लालबहादूर शास्त्रींचे निधन झाले. ताश्कंद हे शहर मध्य आशियातील उझबेकिस्तान देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. भारत – पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे १० जानेवारी इ.स. १९६६ रोजी शांतता करार झाला. या शांतता कराराची औपचारिकता पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी लालबहादूर शास्त्री यांना हृदयविकाराचे दोन झटके येऊन त्यांचे अचानक निधन झाले. लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर भारताच्या प्रधानमंत्री म्हणून इंदिरा गांधी यांची निवड करण्यात आली. त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान होत्या. तसेच त्या जवाहरलाल नेहरू यांची कन्या होत्या. आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधानही होत्या. इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानच्या संदर्भातील दडपशाहीचे धोरण पूर्व पाकिस्तानमध्ये मोठे आंदोलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. प्रस्तावना १९६० चे दशक भाग १ १९६० चे दशक भाग १ १९७० चे दशक १९८० चे दशक भाग १ १९८० चे दशक भाग २ १९९१ नंतरचे बदल भारतीय अर्थव्यवस्था विज्ञान आणि तंत्रज्ञान सामाजिक क्षेत्रातील बदल जागतिकीकरण