भारत १९६० नंतरच्या घडामोडी Go Back १९७० चे दशक views 4:12 १९७० चे दशक :- इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले. त्याच्यातून नवीन स्वतंत्र बांग्लादेश हे राष्ट्र उदयास आले. भारत नेहमी अणुऊर्जेचा वापर शांततेसाठी करेल, या आपल्या धोरणाचा भाग म्हणून भारताने १९७४ मध्ये राजस्थानमधील पोखरण येथे जमिनीच्या अंतर्गत भागात यशस्वी अणुचाचणी केली. त्याच्या पुढील वर्षी म्हणजे १९७५ मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले आणि त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्यात राज्याचा दर्जा मिळाला. याच दशकात भारतातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली. १९७४ मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी निवडणुकीतील प्रचारासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा निकाल उत्तर प्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला. यामध्ये इंदिरा गांधींना दोषी ठरविण्यात आले. न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध देशभरात संप आणि निषेध नोंदविण्यात आले. याच दरम्यान जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली. देशातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आणि शासनाने संविधानातील आणीबाणीविषयक तरतुदींच्या आधारे आणीबाणी घोषित केली. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचे मुलभूत हक्क स्थगित करण्यात आले. २५ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली. प्रस्तावना १९६० चे दशक भाग १ १९६० चे दशक भाग १ १९७० चे दशक १९८० चे दशक भाग १ १९८० चे दशक भाग २ १९९१ नंतरचे बदल भारतीय अर्थव्यवस्था विज्ञान आणि तंत्रज्ञान सामाजिक क्षेत्रातील बदल जागतिकीकरण