भारत १९६० नंतरच्या घडामोडी

१९८० चे दशक भाग २

views

2:51
१९८० चे दशक भाग २ :- भारतीय सैन्य दलांसाठी वेगवेगळ्या संरक्षण सामग्रीची खरेदी करणे गरजेचे असते. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या सरकारने स्वीडन या देशातील बोफोर्स कंपनीकडून लांब पल्ल्याच्या तोफा खरेदी केल्या. त्या संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्यावर बरीच टीका झाली. राजकीय भ्रष्टाचार हा या काळातील निवडणुकांचा एक महत्त्वाचा मुद्दा बनला. राजीव गांधींची स्वच्छ राजकारण्याची प्रतिमा मलीन झाली. अखेर इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसचा पराभव झाला. यानंतर विविध पक्ष एकत्र येऊन जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग हे भारताचे प्रधानमंत्री झाले. इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण धोरण हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान मानले जाते. पक्षांतील अंतर्गत वादविवादांमुळे ते फार काळ प्रधानमंत्री पदावर राहू शकले नाहीत. १९९० मध्ये चंद्रशेखर हे भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांचेही सरकार थोडया काळासाठी टिकले. राजीव गांधी जरी पंतप्रधान नसले तरी ते काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर कायम होते. इ.स. १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभेदरम्यान LTTE (लिट्टे) या संघटनेने मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधींची हत्या केली. त्यामुळे लिट्टे या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. असे करणारा भारत पहिला देश ठरला. याचे अनुकरण करत ३२ देशांनी लिट्टे या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. लिट्टे (LTTE) म्हणजे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम होय. .