भारत १९६० नंतरच्या घडामोडी

सामाजिक क्षेत्रातील बदल

views

3:42
सामाजिक क्षेत्रातील बदल :- भारताच्या सामाजिक क्षेत्रातही अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. यातील काही बदल हे महिलांच्या सक्षमीकरणाच्या समस्येशी संबंधित आहेत. महिलांप्रमाणेच जे काही समाजातील घटक सुधारणांपासून वंचित राहिले होते, त्यांच्याही उन्नतीसाठी स्वीकारण्यात आलेल्या धोरणांशी संबंधित बदल होते. देशातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी १९८५ मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत ‘महिला आणि बाल विकास विभाग’ निर्माण करण्यात आला. स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी आणि योजनांच्या कार्यवाहीस मदत व्हावी म्हणून जे कायदे करण्यात आले त्यात हुंडा प्रतिबंधक कायदा म्हणजे लग्नात मुलीच्या आई – वडिलांकडून पैसा, दागिने किंवा इतर वस्तू घेणे हे कायद्याने गुन्हा ठरविण्यात आले. दुसरा म्हणजे समान वेतन कायदा. म्हणजे एकाच प्रकारचे काम असेल तर पुरुषांएवढे वेतन महिलांना देणे कायद्याने बंधनकारक केले. यामुळे आज सर्व क्षेत्रात वेतनामध्ये स्त्री – पुरुष असा भेदभाव केला जात नाही. महिलांना राजकीय अधिकार प्राप्त व्हावे म्हणून ७३ वी व ७४वी संविधान दुरूस्ती करून स्थानिक शासनसंस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. प्रथम त्या ३३% होत्या. आज त्या ५०% पर्यंत पोहोचल्या आहेत. म्हणूनच आज ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच, पंच, नगरपरिषदांमध्ये महिला नगरसेवक, सभापती दिसत आहेत. अशा तऱ्हेने सरकारने महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक सवलती दिल्या.