भारत १९६० नंतरच्या घडामोडी

१९६० चे दशक भाग १

views

2:38
"१९६० चे दशक भाग १:-१९६० मध्ये घडलेल्या अनेक घडामोडींचा भारताच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम झाला. भारत स्वतंत्र झाला तरी भारताचे काही प्रांत अजूनही परकीयांच्या वर्चस्वाखाली होते. त्यामध्ये पोर्तुगीजांच्या राजवटीखाली गोवा, दमण व दीव हे प्रदेश होते. हे प्रदेश भारताच्या ताब्यात देण्यास पोर्तुगालने नकार दिला. तो प्रदेश मिळविण्यासाठी भारतीयांनी लढा दिला आणि १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला. आणि गोवा, दमण, दीव हे भारतीय संघराज्याचे भाग बनले. भारताच्या भूमीवरून सर्व परकीय खऱ्या अर्थाने निघून गेले. भारताच्या स्वातंत्र्य लढयाची खऱ्या अर्थाने परिपूर्ती झाली. संघराज्य म्हणजे ज्या देशाचा राज्यकारभार संघ म्हणजे केंद्र व राज्य अशा दोन स्तरांवर चालतो, त्यास संघराज्य असे म्हणतात. भारताने संघराज्य शासन पद्धती स्वीकारली आहे. भारताच्या उत्तरेकडील सीमांना लागून असणारे देश म्हणजे नेपाळ, भूटान, चीन हे होत. यातील चीन व भारत यांच्यातील तणाव १९५० पासून वाढत होता. सतत चीनकडून भारताविरोधी कारवाया होत असत. या तणावाचा परिणाम अखेर दोन्ही देशांमधील सीमारेषा युद्धात झाला. हे युद्ध भारत व चीन या दोन देशांदरम्यान असणाऱ्या मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रात १९६२ साली झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू झाले. त्यांनी भारताचे नेतृत्व केले. त्यांनी आधुनिक भारताचा पाया आपल्या कारकिर्दीत घातला. ""