भारत १९६० नंतरच्या घडामोडी

जागतिकीकरण

views

1:58
जागतिकीकरण :-१९९१ ला भारताने उदारीकरणाचा स्वीकार केला व त्यानंतर जे बदल झाले त्याला जागतिकीकरण म्हणतात. अशी जागतिकीकरणाची थोडक्यात व्याख्या करता येईल. जागतिकीकरणाने भारताच्या अनेक क्षेत्रांत बदल घडवून आणले. उदा. :- अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती इ. क्षेत्रात बदल घडून आले याची माहिती आपण घेतली आहे. जागतिक पातळीवरील अनेक क्षेत्रांमध्ये भारत एक महत्त्वाचा देश म्हणून उदयास आला. G – 20 आणि BRICS (ब्रिक्स) (Brazil, Russia, India, China, South Africa) यांचा समावेश असलेल्या BRICS व G – 20 यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत एक सदस्य देश आहे. (याठिकाणी G – 20 व ब्रिक्स परिषदांचे चित्र दाखविणे. व यातील देशांचे जगाच्या नकाशातील स्थान दाखविणे.)दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती भारताने अनुभवली आहे.भ्रमणध्वनी (मोबाईल) आणि आंतरजाल सेवा (इंटरनेट) या पूर्णपणे उपग्रहावर आधारित क्षेत्रातही भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या दूरसंचार सेवा भारताच्या कानाकोपऱ्यात पसरल्या आहेत. अशा तऱ्हेने १९६० नंतर भारताच्या अनेक क्षेत्रात झालेल्या बदलांचा अभ्यास आपण .