ब्रिटिश सत्तेचे परिणाम

तैनाती फौजा

views

4:20
तैनाती फौजा :- लॉर्ड वेलस्ली १७९८ मध्ये गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. इ.स. १७९८ ते १८०५ अशी त्याची कारकीर्द होती. त्याने केलेल्या अनेक लढाया, मिळवलेले विजय व त्याचे डावपेच यामुळे त्याची कारकीर्द खूप गाजली. तो गव्हर्नर जनरल असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्याची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. इंग्रजांनी संपूर्ण हिंदुस्थानावर आपली सर्वश्रेष्ठ सत्ता स्थापन करावी, नाही तर इंग्लंडला निघून जावे, असे त्याचे मत होते. हिंदी राजांना आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी व त्यांचा अधिकाधिक प्रदेश आपल्या ताब्यात आणण्यासाठी त्याने ‘तैनाती फौजेची योजना’ राबविली. या योजनेमुळेच त्याला मोठे यश मिळाले. तैनाती फौजेच्या करारानुसार भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या. त्या अटी पुढीलप्रमाणे होत्या: १. भारतीय राज्यकर्त्यांनी आपल्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे. २. त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून दयावा. ३. तैनाती फौजेचा स्वीकार करणाऱ्या सत्ताधीशांनी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच इतर सत्ताधीशांशी संबंध ठेवावे. ४. तैनाती फौजेचा स्वीकार केलेल्या सत्ताधीशांनी आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट (प्रतिनिधी) ठेवावा. अशा त्या अटी होत्या. मुलांनो, वरील अटींचा विचार केला तर आपल्या लक्षात येते की इंग्रजी लष्कर ठेवल्याने इंग्रज लोकांना रोजगार मिळणार होता. तर हिंदी सैन्य बेरोजगार होणार होते. तसेच कधी त्या राजाने बंड केले तर इंग्रजी सैन्याच्या मदतीने इंग्रज त्याला पराभूत करू शकणार होते. इंग्रजांचा प्रतिनिधी सत्ताधीशांच्या दरबारात असल्याने राजाच्या प्रत्येक हालचालींवर त्यांचे लक्ष राहणार होते.