ब्रिटिश सत्तेचे परिणाम Go Back छत्रपती प्रतापसिंह views 3:04 ""छत्रपती प्रतापसिंह:- बाजीराव पेशव्याच्या शरणागती बरोबरच पेशवाईचा अस्त झाला होता. परंतु तरीही पेशवाईचा एक प्रदेश म्हणजे सातारा येथे मात्र छत्रपती प्रतापसिंह हे आपले संस्थान राखून होते. इंग्रजांनी आपले लक्ष सातारकडे वळविले व छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँट डफ या इंग्रज अधिकाऱ्यांची प्रतापसिंहांना मदत करण्यासाठी नेमणूक केली. परंतु नंतर काही दिवसांनी त्यांना सातारच्या गादीवरून कमी करून काशी येथे ठेवण्यात आले. काशीतच त्यांचा १८४७ मध्ये मृत्यू झाला.प्रतापसिंहावरती झालेल्या अन्यायाबद्दल इंग्लंडमध्ये जाऊन आवाज उठविण्याचा प्रयत्न छत्रपती प्रतापसिंहांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी केले. परंतु त्यांना यश आले नाही. इंग्लंडमधील सत्ताधीशांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर या तत्त्वानुसार १८४८ मध्ये सातारचे राज्य खालसा केले. म्हणजे त्या ठिकाणच्या सत्ताधीशांचे सर्व अधिकार नष्ट केले व सातारचा समावेश इंग्रजी राज्यात केला. त्यांचे स्वातंत्र्य यामुळे नष्ट झाले.माहीत आहे का तुम्हांला? :- सातारचे छत्रपती दुसरे शाहू यांचे चिरंजीव म्हणजे छत्रपती प्रतापसिंह भोसले हे होत. सातारा शहरास पाण्याचा तुटवडा जाणवू लागल्याने महाराजांनी यवतेश्वर व महादरा येथे तलाव बांधले व खापरी नळाने शहरामध्ये पाणी आणले. आपल्या राज्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी अनेक रस्ते बांधले "" प्रस्तावना तैनाती फौजा छत्रपती प्रतापसिंह ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम:दुहेरी राज्यव्यवस्था मुलकी नोकरशाही इंग्रजांची आर्थिक धोरणे नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम: वाहतूक व दळणळण व्यवस्थेत सुधारणा सामाजिक व सांस्कृतिक परिणाम