ब्रिटिश सत्तेचे परिणाम

वाहतूक व दळणळण व्यवस्थेत सुधारणा

views

04:51
वाहतूक व दळणळण व्यवस्थेत सुधारणा: इंग्रजी राजवटीचे हिंदी समाजावर काही वाईट परिणाम झाले ते आपण पाहिले. पण या राजवटीचे काही चांगले परिणामही घडून आले. इंग्रजांनी आपला भारतातील व्यापार वाढावा आणि राज्यकारभार करणे सोयीचे व्हावे यासाठी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या. कोलकत्ता व दिल्ली या दोन प्रमुख शहरांना जोडणारा महामार्ग बांधला. तसेच देशातील पहिली रेल्वे १८५३ साली मुंबई-ठाणे या मार्गावर धावू लागली, दळवळणाची सोय म्हणून १८५३ ला तारायंत्राद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली. या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे उदा: दिल्ली, मुंबई, मद्रास, कोलकत्ता आणि इंग्रजांची लष्करी ठाणी एकमेकांना जोडली गेली. त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाकव्यवस्थाही सुरु केली. इंग्रजांनी सुरु केलेली डाकव्यवस्था आजही आपल्या देशात प्रभावी कार्य करताना दिसत आहे. मुलांनो, इंग्रजांनी या सर्व सुधारणा त्यांच्या फायद्यासाठी केल्या असल्या तरी या सर्व सुधारणांमुळे भारतीय समाजजीवनावर खूप दीर्घकाळ परिणाम झाले. देशातील विविध भागांमधील लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढू लागला. मद्रासचा माणूस मुंबईतील माणसाला भेटू लागला. यामुळे लोकांच्या विचारांची देवाण-घेवाण होऊ लागली. एकमेकांच्या प्रांतातील चांगल्या - वाईट गोष्टी त्यांना समजू लागल्या. त्यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास हातभार लागला.