ब्रिटिश सत्तेचे परिणाम

इंग्रजांची आर्थिक धोरणे

views

04:12
इंग्रजांची आर्थिक धोरणे : भारतावर वर्चस्व गाजविणारे इंग्रज हे पहिले सत्ताधीश नव्हते. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली. उदा. ग्रीक सम्राट सिंकदर, महम्मद घोरी, बाबर यांसारख्या अनेक सम्राटांनी भारतावर आक्रमणे केली. मुघलासांरखे अनेक आक्रमक भारतातच स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीत मिसळून गेले. ते जरी भारतात राहिले तरी त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत जास्त बदल केले नाहीत. इंग्रज मात्र तसे नव्हते. त्यांनी भारतीय आर्थिक व्यवस्थेत फार मोठे बदल केले. त्याला कारणही तसेच होते. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यामुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रुजली होती. व्यापारातून मिळालेला पैसा ते आणखी उद्योगधंदे व कारखाने काढण्यासाठी गुंतवत होते. तसेच औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनाचा वेग वाढला होता. खूप मोठ्या प्रमाणात माल उत्पादित केला जात होता. तो माल खपविणे गरजेचे होते. माल उत्पादित करण्यासाठी कच्चा माल आवश्यक होता. आपला हेतू साध्य करून जास्तीत जास्त आपला फायदा व्हावा यासाठी त्यांनी आपल्या व्यवस्थेला फायदेशीर अशी अर्थव्यवस्था भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडला आर्थिक लाभ झाला. प्रचंड संपत्ती इंग्रजांनी भारतातून इंग्लंडला नेली. भारतीयांची अक्षरशः लूट केली. भारतीयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण केले.