ब्रिटिश सत्तेचे परिणाम

नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम:

views

04:21
नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम: ब्रिटिशांनी सुरु केलेल्या नव्या महसूल व्यवस्थेचे वाईट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले. वेळेत शेतसारा भरण्यासाठी शेतकरी येईल त्या किंमतीला आपले पीक फायदा-तोटा न पाहता विकू लागले. कारण शेतसारा योग्य वेळेत भरला नाही तर इंग्रज जमिनी जप्त करत असत. आपल्या जमिनी जप्तीपासून वाचविण्यासाठी शेतकरी दलाल व व्यापाऱ्यांना मिळेल त्या किंमतीत माल विकू लागले. व्यापारी व दलालही या परिस्थितीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांचा माल कमी दराने खरेदी करू लागले. काही वेळा शेतकऱ्यांना शेतसारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जाची फेड न करता आल्याने सावकाराचे पैसे देण्यासाठी त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागल्या. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करत. मुलांनो, नव्या जमीन महसूल व्यवस्थेमुळे शेती व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्याला एकवेळचे जेवण मिळणेही कठीण झाले. परंतु इंग्रज सरकारने स्वत:चा हेतू साध्य करून आपल्या देशाच्या प्रगतीसाठी भारतीय शेतकऱ्यांचा पुरेपूर वापर करून घेतला..