बेरीज

बेरजेची आडवी मांडणी

views

2:00
बेरजेची आडवी मांडणी: मुलांनो, ७५१३+१२७३ या संख्यांची आडवी मांडणी करून बेरीज करायची असेल, तर सर्वप्रथम आपण एकक स्थानी असलेल्या अंकांची बेरीज करू. दोन्ही संख्येत एकक स्थानी ३ हा अंक आहे. म्हणून ३ अधिक ३ बरोबर ६ एकक, १ दशक + ७ दशक = ८ दशक झाले. ५ शतक + २शतक = ७ शतक झाले. ७ हजार + १ हजार = ८ हजार झाले. म्हणून त्याची एकत्रित बेरीज ७५१३+१२७३=८७८६ झाली. आता आपण आणखी एक उदाहरण सोडवू. उदाहरण: 1) ७००६ + २१९३ = किती? सर्व प्रथम ६ एकक व ३ एकक यांची बेरीज करू. नंतर दशक स्थानावरील अंकांची बेरीज करू. दशक स्थानी ० व ९ हे अंक आहेत. कोणत्याही संख्येत शून्य मिळवला की उत्तर शून्यच येते. म्हणून त्यांची बेरीज ९ झाली. शतक स्थानी ० व १ हे अंक आहेत. म्हणून त्यांची बेरीज १ झाली. हजार स्थानी ७ व २ हे अंक आहेत. म्हणून त्यांची बेरीज ९ झाली. म्हणून ७००६ + २१९३ = ९१९९ झाले. अशाप्रकारे आपण आडवी मांडणी करूनसुद्धा बेरीज करू शकतो.