बेरीज

बेरीज करा

views

4:31
बेरीज करा: उदा. १) ६७८५ + ७४५३ = ? हे गणित सोडवताना प्रथम संख्यांची उभी मांडणी करून घेऊया. एककात एकक मिळवू. ५+३= ८ एकक. आता ८ दशकामध्ये ५ दशक मिळवू = १३ दशक झाले. म्हणजेच १ शतक आणि ३ दशक. म्हणून आपण १ हातचा शतकाच्या घरात लिहू व ३ दशक स्थानी उत्तरात लिहू. आता शतक स्थानी असलेल्या अंकांची बेरीज करू व त्यामध्ये घेतलेला हातचा मिळवू. ७ शतक + ४ शतक +१ शतक = १२ शतक झाले. म्हणजे १ हजार आणि २ शतक. यातील १ हातचा हजार स्थानी लिहू आणि २ शतकात उत्तरात लिहू. हजार स्थानी आहेत ६ हजार व ७ हजार. यांची बेरीज करून त्यात आलेला १ हातचा मिळवू. म्हणून ६ हजार + ७ हजार + १ हातचा मिळून १४ हजार झाले. १४ हजार म्हणजे १ दशहजार आणि ४ हजार. यातील १४ हे एकाच स्थानात लिहिता येणार नाहीत. म्हणून आपण यातील १ लिहिण्यासाठी नवीन दशहजाराचे स्थान तयार करून त्यात १ लिहिला आणि ४ उत्तरात हजाराच्या घरात लिहिले. म्हणून ६७८५ + ७४५३ यांची बेरीज १४२३८ इतकी झाली.