बेरीज

बेरीज हातच्याची

views

4:31
बेरीज हातच्याची: मुलांनो, हातच्याची बेरीज समजण्यासाठी आपण एक उदाहरण सोडवू. तन्वीजवळ ६३७ मणी आहेत. सान्वीजवळ ५७४ मणी आहेत. तर दोघींजवळ मिळून एकूण किती मणी आहेत? पहा मुलांनो, तन्वीजवळ सहा शतक बटवे, तीन दशकमाळा व सात सुटे मणी आहेत. आणि सान्वीजवळ पाच शतक बटवे, सात दशकमाळा व चार सुटे मणी आहेत. ७ सुटे मणी व ४ सुटे मणी एकत्रित केले की एक दशक माळ तयार होते आणि १ मणी शिल्लक राहतो. ३ दशकमाळा व सात दशकमाळा मिळवल्यावर १० दशक माळा तयार होतात. त्यात आपण नवीन तयार झालेली दशकमाळ मिळवल्यावर ११ दशकमाळा तयार होतील. आपल्याला माहीत आहे की १ शतक म्हणजे १० दशक. आपल्याकडे एकूण ११ दशकमाळा आहेत. आता या १० दशकमाळा एकत्रित करून एक शतक बटवा तयार होईल आणि एक दशक माळ तशीच राहील. दोघींजवळ मिळून एकूण ११ शतक बटवे आहेत. त्यात तयार झालेला नवीन शतक बटवा मिळवू. त्यामुळे आता एकूण १२ शतक बटवे तयार झाले. १० शतक म्हणजे १००० (एक हजार) आता आपण १२ शतक बटव्यापैकी १० शतक बटवे घेऊन एक हजाराचे पाकीट बनवू व २ शतक बटवे तसेच ठेवू. म्हणून दोघींजवळ मिळून एक हजार -पाकीट, २ शतक -बटवे, १ दशकमाळ आणि १ सुटा मणी मिळून एकूण १२११ मणी होतील .