बेरीज Go Back चार अंकांपर्यंतच्या संख्यांची बेरीज views 3:10 चार अंकांपर्यंतच्या संख्यांची बेरीज: मुलांनो, आता आपण चार अंकी संख्यांची बेरीज कशी करायची ते काही उदाहरणांतून समजून घेऊ. उदा: १) ७ + ४८९५ + १३७ = ? मुलांनो चार अंकी संख्यांची बेरीज करताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, योग्य त्या घरात योग्य त्या स्थानाचा अंक लिहावा. आता हेच उदाहरण पहा, यातील ७ हा अंक एकक आहे. त्यामुळे आपल्याला तो एककाच्याच घरात लिहावा लागेल. त्याची मांडणी जर आपण इतर कोणत्याही घरात केली तर ते उदाहरण चुकीचे ठरेल. आता आपण गणित सोडविण्यास सुरुवात करू. तर एकक स्थानी ७+५+७ यांची बेरीज करून उत्तर मिळाले १९. म्हणजेच १ दशक आणि ९ एकक. म्हणून १९ मधील दशकस्थानी १ हातचा लिहू. दशक स्थानी आता १ दशक + ९ दशक + ३ दशक मिळून १३ दशक झाले. 13 दशकातील १ हातचा शतकाच्या घरात लिहू आणि उत्तरात दशकात ३ लिहू. शतक स्थानी १ शतक + ८ शतक + १ शतक मिळून १० शतक झाले. १० शतक म्हणजे १ हजार. म्हणून यातील १ हातचा हजाराच्या घरात लिहून, शतकस्थानी उत्तरात शून्य लिहू. हजार स्थानी १ व ४ यांची बेरीज ५ झाली. म्हणून ७ + ४८९५ + १३७ = ५०३९ झाले. उजळणी बेरजेची आडवी मांडणी बेरीज हातच्याची चार अंकांपर्यंतच्या संख्यांची बेरीज बेरीज करा पाच अंकी संख्यांची आडव्या मांडणीने बेरीज