भागाकार: भाग १

उजळणी

views

2:55
उजळणी : भागाकार म्हणजे समान वाटणी होय. मागील इयत्तेमध्ये आपण या भागाकारविषयी माहिती घेतली होती. त्याची थोडी उजळणी घेऊ आणि भागाकाराची आणखी थोडी माहिती करू घेऊ. चला तर मग, आपण काही उदाहरणे सोडवू. उदाहरण १ : २० चॉकलेट पाच मुलांना समान वाटली तर प्रत्येकाला किती चॉकलेट मिळतील? शि: मुलांनो, येथे चॉकलेटची संख्या २० आहे. आणि मुलांची संख्या ५ आहे. आता आपण या प्रत्येकाला समान चॉकलेट देऊया. पहा, पाच मुलांना प्रत्येकी ४ चॉकलेट मिळाली. आणि शिल्लक काहीच राहिले नाही. म्हणजेच चॉकलेटची समान वाटणी झाली आहे. आता हेच उदाहरण आपण भागाकार मांडणी स्वरूपात सोडवू. ÷ हे भागाकाराचे चिन्ह आहे. २० ÷ ५ करताना ५ ने २० ला भाग जातो का हे बघावे. म्हणजेच ५ च्या पाढ्यात २० ही संख्या येते का ? तर हो. ५ x ४ म्हणजेच पाच चोक वीस होतात. म्हणून प्रत्येकाला ४ चॉकलेट मिळतील.