भागाकार: भाग १

गुणाकार – भागाकार यांचा परस्पर संबंध:

views

2:19
गुणाकार – भागाकार यांचा परस्पर संबंध: शि: मुलांनो, आता आपण गुणाकार व भागाकाराचा परस्पर संबंध काय आहे ते बघूया. सुभाष : रोहित चल आपण खोक्यातील रिंगा स्टँडवर अडकवू. पण प्रत्येक स्टँडवर समान रिंगा अडकवल्या पाहिजेत. रोहित : या खोक्यात एकूण १२ रिंगा आहेत. सुभाष : आणि एकूण तीन स्टँड आहेत. रोहित : चल मग आपण या प्रत्येक स्टँडवर एक एक रिंग अडकवूया. सुभाष : एकूण १२ रिंगा, तीन स्टँडवर समान अडकवल्या. तर प्रत्येक स्टँडवर किती रिंगा? मोजून बघ. रोहित : अरे तू तर भागाकार विचारतोस. १२ ÷ ३ = ४. प्रत्येक स्टँडवर ४ रिंगा, बरं मला सांग प्रत्येक स्टँडवर ४ रिंगा याप्रमाणे १२ रिंगा किती स्टँडवर अडकवल्या गेल्या? सुभाष : अरे हा पण भागाकारच! १२ ÷ ४ = ३ म्हणजे तीन स्टँडवर अडकवल्या गेल्या. शिक्षक : पाहिलंत, दोन्ही पद्धतींनी केला तरीही तो भागाकारच झाला. असं का असते ते आपण पाहूया. कारण गुणाकारात ३ x ४ = १२ आणि ४ x ३ = १२ च असतात. म्हणजेच गुण्य व गुणकांची अदलाबदल जरी केली तरीही येणाऱ्या गुणाकारात काही फरक पडत नाही. तसेच १२ ÷ ३ = ४ आणि १२ ÷ ४ = ३ च येतात. याचाच अर्थ आपल्याला एका गुणाकारावरून दोन भागाकार समजतात.