भागाकार: भाग १ Go Back सरावासाठी उदाहरणे views 3:50 सरावासाठी उदाहरणे: मुलांनो, आणखी काही उदाहरणे आपण समजून घेऊया. आजोबांनी गोळ्यांचा पुडा आणला आणि रसिक, रोहन, रमेश यांना गोळ्या समान वाटून घ्या असे सांगितले रोहन : सर्वप्रथम आपण या सर्व गोळ्या मोजूया. मी गोळ्या मोजतो. एकूण ५८ गोळया आहेत. रमेश : आपण एक एक गोळी वाटूया का? रसिक : पण त्यात खूप वेळ जाईल. म्हणून अगोदर दहा वाटून घेऊ. तिघांमध्ये १० याप्रमाणे ३० गोळया वाटून झाल्या. ५८ – ३० = २८ गोळ्या उरल्या. रोहन : २८ गोळया उरल्या आहेत तर आता आपण आणखी ९ नऊ गोळया घेऊया. कारण नऊ त्रिक सत्तावीस व एक गोळी उरेल. पहा २८ – २७ = १ गोळी उरली. म्हणजेच प्रत्येकाला १० + ९ = १९ गोळया मिळतील आणि १ गोळी शिल्लक राहिली. रमेश : आजोबा ही १ गोळी तुम्ही घ्या. म्हणजे आमच्यात भांडणं होणार नाहीत. आजोबा : बरोबर! तुम्ही भागाकार चांगल्याप्रकारे केला. पण मोठया संख्यांना भाग देताना भागाकार चटकन करण्यासाठी मांडणी करून भागाकार करतात. जर तुम्हाला ५८ ÷ ३ करायचे असतील तर, कसे कराल? पहा या भागाकारात भाज्य ५८ व भाजक ३ आहे. म्हणून सर्वप्रथम ५ दशकांची वाटणी करू. यासाठी ३ च्या पाढयात ५ आहेत का ते पाहू. नसतील तर ५ पेक्षा लहान संख्या शोधू. ३ एके ३, ३ दुणे ६, ६ हे ५ पेक्षा मोठे आहेत. म्हणून आपल्याला येथे १ ने भाग द्यावा लागेल. म्हणून रेषेच्या वर म्हणजे भागाकारात १ लिहिला. आणि ५ मधून ३ वजा केले तर २ उरले. आता ८ एकक खाली घेऊ. पहा येथे २८ ही संख्या तयार झाली. ३ च्या पाढ्यात २८ ही संख्या नाही. २८ पेक्षा जवळची लहान संख्या २७ आहे. ३ नवे २७. म्हणून ९ ने भाग देऊ. २८ मधून २७ वजा करू: २८ – २७ = १. म्हणून भागाकार १९ आला व बाकी १ राहिली. अशाप्रकारे भागाकार केल्यामुळे मोठ्या संख्यांचा भागाकारही चटकन सोडवता येतो. सरावासाठी उदाहरणे भागाकार करा: शून्याला शून्येतर संख्येने भागणे उजळणी गुणाकार – भागाकार यांचा परस्पर संबंध: दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे