भागाकार: भाग १ Go Back दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे views 4:24 दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे: शि: मुलांनो, आता आपण दोन अंकी संख्येला एका अंकी संख्येने कसे भागतात, ते पाहूया. त्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. उदाहरण: चार शेतकऱ्यांनी मिळून खताची ८४ पोती खरेदी केली. आणि ती चौघांत समान कशी वाटावी याचा विचार ते करू लागले. त्यातील पहिल्या शेतकऱ्याने एक रीत सुचवली. आपण चौघे आहोत व पोती ८४ आहेत. पायरी १ : प्रत्येकाला १० पोती घेऊ. (१० + १० + १० + १०) = ४० म्हणजेच ४ x १० = ४० पोती वाटली. तरीसुद्धा अजून ८४ – ४० = ४४ पोती शिल्लक राहिली आहेत. पायरी २ : आता उरलेल्या ४४ पोत्यांपैकी आणखी १० पोती प्रत्येकजण घेऊ. १० + १० + १० + १० = ४०म्हणजेच ४ x १० = ४० पोती वाटली. तरीही अजून ४४ – ४० = ४ पोती उरली. पायरी ३ : आता या ४ पोत्यांपैकी प्रत्येकाने १ पोते घेऊया. १ + १ + १ + १ = ४ म्हणजेच ४ x १ = ४ पोती वाटली. आता ४ – ४ = ० पोती उरली. तर प्रत्येकाला त्याच्या वाटणीची १० + १० + १ = २१ पोती मिळाली. सरावासाठी उदाहरणे भागाकार करा: शून्याला शून्येतर संख्येने भागणे उजळणी गुणाकार – भागाकार यांचा परस्पर संबंध: दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे