माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता

प्रस्तावना प्रसंग -१:प्रसंग - २ आणि चूक लक्षात आली!

views

2:52
प्रस्तावना : मुलांनो, मागील पाठात आपण आपल्या वर्गात असलेल्या मुली आणि विशेष गरजा असलेल्या मुलामुलींना कशी व का मदत केली पाहिजे याविषयी माहिती घेतली. तसेच आपल्या अवती भोवतीही काही माणसे अशी असतात, की त्यांना आपल्या मदतीची गरज असते. त्यांना मदत करून आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायला हव्यात. त्या जबाबदाऱ्या कोणत्या व त्या कशा पार पाडायच्या याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. प्रसंग -१: मुलांनो तुमच्याच वयाची दीपिका नावाची मुलगी होती. त्या दीपिकाचा वाढदिवस होता. तिने तिच्या मित्रमैत्रिणींना घरी बोलावले होते. मैत्रिणी आल्यानंतर तिने मोठ्या आवाजात गाणी लावली. सगळ्याजणी हसत खेळत मजा करत होत्या. तेवढ्यात शेजारच्या घरातील आजोबा आले. आजोबांनी दीपिकाला गाण्याचा आवाज हळू म्हणजेच कमी करायला सांगितला. कारण दीपिकाच्या शेजारी राहणाऱ्या आजोबांना उच्च रक्तदाबाचा आजार होता. दीपिकाने मोठ्या आवाजात गाणी लावल्यामुळे त्या आवाजाच्या त्रासाने त्यांच्या छातीतील धडधड वाढून आजोबांना त्रास होऊ लागला होता. आपल्यामुळे आजोबांना त्रास होऊ लागला हे दीपिकाला समजताच आजोबांना त्रास होऊ नये म्हणून दीपिकाने लगेच गाण्याचा आवाज कमी केला.