माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता

करून पहा

views

4:34
करून पहा – मुलांनो आता आपण एक प्रयोग करायचा आहे. या प्रयोगातून आपण अंध/दृष्टिहीन व्यक्ती कशा जीवन जगत असतील त्याचा अनुभव घेणार आहोत. शिक्षक : मुलांनो, पाहिलंत दोन मिनिटे आपल्या डोळ्यांना पट्टी बांधली तर आपली काय परिस्थिती झाली! मग विचार करा, ज्यांना आयुष्य अशा परिस्थितीत काढावे लागते त्यांची काय अवस्था होत असेल? त्यांना किती अडचणींना तोंड द्यावे लागत असेल? रस्त्यावरून जाताना हातात पांढरी काठी घेऊन चाललेली एखादी दृष्टिहीन व्यक्ती तुम्ही पाहिली असेल. अशा पांढऱ्या रंगाच्या काठीच्या मदतीने दृष्टिहीन व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने हिंडू फिरू शकतात. अशा व्यक्तींची गैरसोय होऊ नये म्हणून काही इमारतींमधील लिफ्टपाशी मजल्यांचे क्रमांक ब्रेल लिपीमध्ये लिहिलेले असतात. ब्रेललिपी अंध लोकांसाठी असते. त्या अक्षरावर हात फिरवून ते अंक व अक्षरे ओळखू शकतात. या ब्रेल लिपीचा वापर करून ते कोणाच्याही मदतीशिवाय अशा इमारतींमध्ये हव्या त्या मजल्यावर जाऊ शकतात.