माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता

ब्रेल लिपी

views

2:17
ब्रेल लिपी: दृष्टिहीन व्यक्ती ज्या स्पर्शाच्या लिपीचा वापर करून लिहू वाचू शकतात, त्या लिपीला ब्रेल लिपी असे म्हणतात. या लिपीत प्रत्येक अक्षरासाठी काही टिंबे ठरलेली आहेत. तुम्हाला ती दिसतच आहेतच. खुणांची भाषा:मुलांनो, जसे दृष्टिहीन व्यक्तींसाठी ब्रेल लिपी असते. तसेच कर्णबधीर लोकांसाठी खुणांची भाषा असते. कर्णबधीर म्हणजे ज्यांना कानांनी ऐकू येत नाही अशा व्यक्ती. त्यांना समजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खुणा समोरच्या तक्त्यात दिसत आहेत. मुलांनो, अशा व्यक्तींना समजाव्यात म्हणून दूरदर्शनवर दुपारी १ वाजता विशेष बातम्या दाखविल्या जातात. त्या तुम्ही पाहिल्या असतील. त्या बातम्यांमधील काही शब्द या तक्त्याच्या आधारे तुम्हाला समजतात का ते तुम्ही घरी पहा.