माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता

माहीत आहे का तुम्हांला

views

2:38
माहीत आहे का तुम्हांला :- मुलांनो, आपल्या आसपासच्या परिसरात काही मुलीमुले किंवा मोठी माणसे पोलिओग्रस्त असतात. पूर्वी बऱ्याच लोकांना पोलिओ होत असे. पोलिओचा ताप यायचा व त्यात व्यक्तीचे हात – पाय लुळे पडत असत. या पोलिओवर लस शोधून काढण्यात आली. त्या लसीमुळे आपल्या देशातील पोलिओ हा आजार हद्दपार करण्यात यश मिळाले आहे. आज आपल्या देशातून पोलिओ समूळ नष्ट झाला आहे. ० ते ५ या वयोगटातील मुलांना पोलिओची लस दिली जाते. अशी ही पोलिओ लस देण्याचा कार्यक्रम संपूर्ण देशात राबविला जातो. आपल्या या कामगिरीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO = World Health Organation) ने आपल्या देशाची प्रशंसा म्हणजेच कौतुक केले आहे. मुलांनो, तुम्ही टीव्हीवर अमिताभ बच्चन यांची जाहिरात पाहिली असेल. ‘दो बूंद जिंदगी के’ अशा आशयाची ही जाहिरात आहे. याचा अर्थ दोन थेंब पोलिओच्या लसीचे दिल्याने आपल्याला नवीन जीवन मिळणार आहे.