माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता

माहीत आहे का तुम्हाला:

views

2:35
माहीत आहे का तुम्हाला: 1) मुलांनो, सुधा चंद्रन ह्या भरतनाट्यम नृत्यात पारंगत असलेल्या नर्तिका आहेत. त्या केवळ १६ वर्षांच्या असताना एक भयंकर अपघात होऊन त्यांचा पाय तुटला. तरीही त्यांनी धीर सोडला नाही. कृत्रिम पायाच्या मदतीने तिने आपले नृत्य चालूच ठेवले. मुलांनो, जर जिद्द असेल तर आपण कोणत्याही अडथळ्यांवर मात करू शकतो. आपण काय शिकलो : मुलांनो, या पाठातून आपण कोणत्या गोष्टी शिकलो? तर 1) आपल्या कुटुंबातील आणि परिसरातील व्यक्तींच्या अडीअडचणी समजून घेणे, वेळ प्रसंगी अशा व्यक्तींना मदत करणे म्हणजे संवेदनशील असणे होय. 2) आपल्या आजूबाजूला किंवा कुटुंबात असणाऱ्या वृद्ध, आजारी व विशेष गरजा असलेल्या व्यक्तींशी आपण प्रेमाने व आदराने वागले पाहिजे. त्यांच्याबद्दल आपल्या मनात प्रेमाची भावना असली पाहिजे 3) आपल्यात असलेल्या संवेदनशीलतेमुळे आपल्यातील एकमेकांना मदत करण्याची वृत्ती वाढीस लागते.