माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता

सांगा पाहू. :-घरात किंवा शेजारी आजारी माणसे असतील तर तुम्ही काय कराल?

views

4:04
विशेष गरजा असलेल्या व्यक्तीविषयीची माझी जबाबदारी :- मुलांनो, वृद्ध माणसे व आजारी माणसे यांची आपण कशी काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती घेतली. आता आपण विशेष गरजा असलेल्या व्यक्तींविषयी माहिती घेणार आहोत. मुलांनो, आपण आपल्या आसपास पाहतो, की काही व्यक्ती जन्मत: आजारी असल्यामुळे किंवा एखादा अपघात झाल्यामुळे अपंग होतात. त्यांना शारीरिक अपंगत्व येते. उदा. पोलिओ झालेल्या व्यक्तींचे हात किंवा पाय लुळे पडतात. त्यांचे हात किंवा पाय निकामी होतात. तर काही लोकांना अपघात झाल्याने हात, पाय तुटतात. त्यामुळे त्यांना शारीरिक अपंगत्व येते किंवा एखादया वेळी एखादया अपघातात डोळे जातात. अशा शारीरिक अपंगत्व आलेल्या व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी वावरताना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. अशा व्यक्तींना विशेष सेवा – सुविधा आणि मदतीची गरज असते. आपण अशा व्यक्तींना आपल्या परीने मदत केली पाहिजे.