मापन

मीटरचा आणि किलोमीटरचा अर्धा, पाव, पाऊण

views

4:42
याआधी आपण मीटर आणि किलोमीटर यातील फरक समजून घेतला. पण आता आपण याचाच अर्धा, पाव, पाऊण म्हणजे काय असतो हे समजून घेऊया. ५० सेमी + ५० सेमी = १०० सेमी होतात. १०० सेमी म्हणजेच १ मीटर होतो. १ मीटरचा अर्धा ५० मीटर होतो. म्हणून ५० सेमीचा अर्धा = २५ सेंटिमीटर होईल. अर्ध्याचा अर्धा म्हणजे पाव मीटर असतो. म्हणून १ मीटरचा पाव म्हणजे २५ सेमी. मुलांनो, अर्धामीटर (५० सेमी) व पावमीटर (२५ सेमी) मिळून पाऊण मीटर म्हणजे ७५ सेमी होते. याचा वापर करून आपण किलोमीटरचेही अर्धा, पाव, पाऊण करू शकतो. कसे ते पहा: १ किलोमीटर म्हणजे १००० मीटर. मग १००० मीटरचा अर्धा म्हणजे ५०० मीटर होईल. आणि १००० चा पाव किलोमीटर म्हणजे २५० मीटर होईल. आणि पाऊण किलोमीटर म्हणजेच ५०० + २५० मीटर बरोबर ७५० मीटर होईल.