मापन

मापन-शाब्दिक उदाहरणे

views

4:12
मापन-शाब्दिक उदाहरणे: मुलांनो आतापर्यंत आपण मीटर, सेंटिमीटर, किलोमीटर, ग्रॅम, किलोग्रॅम, लीटर, मिलिलीटर या एककांची माहिती घेतली. आता आपण मापनांवर आधारित काही शाब्दिक उदाहरणांचा सराव करू: उदा:1) संगमनेरहून सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सुटलेली गाडी मालेगावला सकाळी १० वाजून १० मिनिटांनी पोहचली. तर या प्रवासाला किती वेळ लागला. शि: तर पहा मुलांनो, सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांपासून ७ वाजेपर्यंत १५ मिनिटे होतात. ७ वाजल्यापासून १० वाजेपर्यंत ३ तास झाले. आणि १० वाजल्यापासून १० वाजून १० मिनीटांपर्यंत १० मिनिटे वेळ लागला. म्हणजे प्रवासाला लागलेला एकूण वेळ आहे. १५ मिनिट + ३ तास + १० मिनिटं, म्हणजेच ३ तास २५ मिनिटं झाली. समजले? वि: हो, सर.