वाढ आणि व्यक्तिमत्त्व विकास

जरा डोके चालवा

views

5:51
या पाठात आतापर्यंत तुम्ही अनेक कौशल्यांचा अभ्यास केला. अनेक कौशल्यांबद्दलची माहिती घेतली. त्यापैकी कोणकोणती कौशल्ये तुम्हांला नाही आली तरी चालू शकेल? कोणती कौशल्ये येणे आवश्यक आहेत? आलेल्या कौशल्यांपैकी निबंध लिहिणे, केस विंचरणे, चहा करणे, गाणे/ कविता पाठ करणे, पोहणे, सायकल चालविणे, पैसे मोजणे, घर आवरणे, मैदानी खेळ खेळणे, स्वत:च्या हाताने जेवणे, कपड्यांच्या घड्या घालणे, तोंड धुणे, आंघोळ करणे, कपडे घालणे, स्वयंपाक बनवणे, किराणा सामान आणणे, आजारी व्यक्तीची सेवा करणे, सारांशलेखन करणे पत्र लिहिणे यांसारखे कौशल्ये आमच्यासाठी आवश्यक आहेत. तर आवश्यक नसलेली किंवा थोडी कमी महत्त्वाची कौशल्ये म्हणजे दोरीवरच्या उड्या मारणे, गोष्ट सांगणे, भाषण देणे, झाडावर चढणे, फुटबॉल खेळणे, लगोरी खेळणे, इस्त्री करणे ही कामे कौशल्ये नाही आली तरी चालतील. ती एवढी महत्त्वाची नाहीत.