वाढ आणि व्यक्तिमत्त्व विकास

वाचा आणि विचार करा

views

3:28
एक कारखानदार होता. त्याने खूप मेहनतीने आपला व्यवसाय वाढविला होता. त्याला मदत करणारे त्याचे तीन सहायक होते. कारखानदाराला नेहमी वाटत असे, की आपण थकलो की हा कारखाना सांभाळायला या तिघांपैकी कोणाकडे द्यावा? एकदा असाच विचार करीत असताना त्याला एक कल्पना सुचली. कारखाना कोणी सांभाळावा हे ठरविण्यासाठी त्याने एक प्रयोग करायचे ठरविले. त्यासाठी त्याने त्या तिघांना बोलावून घेतले व प्रत्येकाला पाच-पाच लाख रुपये दिले. आणि त्या रकमेचे त्यांना पाहिजे ते करण्यास सांगितले. एक वर्षाचा कालावधी होऊन गेल्यानंतर कारखानदाराने आपल्या तिन्हीही सहायकांना बोलावून घेतले, व त्यांना विचारले, तुम्ही मी दिलेल्या पाच लाख रुपयांचे काय केले? त्या तिघांनी सांगायला सुरुवात केली. पहिला सहायक: तुम्ही दिलेले पैसे मी अगदी सुरक्षित ठेवले आहेत. माझ्याशिवाय ते कोणाच्या हाती लागू शकणार नाहीत. तुम्ही म्हणाल तेव्हा ते तुम्हांला आणून देतो. दुसरा सहायक: आपण वर्षातून एकदा आपल्या कामगारांना बोनस देतो. या वेळेला मी सर्वांना दुप्पट बोनस दिला आणि मेजवानीही दिली. आपले सर्व कामगार खूप खूश झाले. माझ्याकडचे पैसे मी असे सत्कारणी म्हणजे चांगल्या कामाला लावले. तिसरा सहायक: तुम्ही दिलेल्या पैशातून मी एक अधिक चांगले मशीन आणले. त्यामुळे आपले उत्पादन पाच पटीने वाढले. शिवाय उत्पादनाचा दर्जा सुधारला. म्हणून त्याला खूप मागणी येत आहे. त्यामुळे सात-आठ महिन्यातच आपल्याला जवळजवळ 25 लाख रुपये इतका फायदा झाला. मजुरांना कँटीनची गरज होती. म्हणून 10 लाख रुपये वापरून मी कँटीन बांधले. ५ लाख रुपये आपल्या कारखान्याच्या कामगार कल्याण निधीत टाकले. जुने मशीन लवकरच बदलावे लागणार आहे. शेवटचे 10 लाख रुपये त्यासाठी वापरावे असा विचार आहे.