वाढ आणि व्यक्तिमत्त्व विकास

चांगला विकास होण्यासाठी

views

4:48
चांगली कौशल्ये आपण आत्मसात केल्यामुळे प्रगती किंवा विकास होत असतो. अनेक नवीन कौशल्ये शिकण्याच्या क्षमता आपल्याकडे आनुवंशिकतेने येतात. आपल्या वाढीचे वय म्हणजे आपल्यातील क्षमता ओळखण्याची आणि आपल्यातील कौशल्ये विकसित करण्याची आपल्याला मिळालेली संधी असते. कौशल्यांच्या आधारे स्वतंत्रपणे उपयोगी आणि समृद्ध जीवन जगण्याची तयारी होते. चांगला आहार: मुलांनो, आपल्या शारीरिक वाढीसाठी आपल्याला अन्नाची गरज असते हे तुम्हांला माहीत आहे. परंतु काही परिस्थितीत म्हणजे गरिबी, मुलगा-मुलगी असा केला जाणार भेदभाव यांसारख्या कारणांमुळे वाढ होण्याच्या वयात कुपोषणामुळे मुलांना विविध अन्नघटक पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. याचा परिणाम असा होतो की चांगला आहार मिळून जेवढी त्या मुलाची किंवा मुलीची उंची झाली असती त्यापेक्षा ती कमी होते. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आवश्यक असलेले घटक मिळत नाहीत. त्यामुळे शरीराची वाढ खुंटते. तुम्ही म्हणाल की नंतर परिस्थिती बदल्यानंतर आपण भरपूर चांगला व सकस आहार घेऊ म्हणजे आपली उंची वाढेल, पण मुलांनो असे होत नाही. वाढीचे वय निघून गेल्यावर चांगला आहार मिळाला, तरी त्याचा वाढीसाठी उपयोग होत नाही. त्यातून आपले वजन वाढू शकते, पण उंची वाढू शकत नाही. विकासाला पूरक अशा इतर गोष्टी: उत्तम विकास होण्यासाठी पौष्टिक व सकस आहाराबरोबर पुरेशा व्यायामाची गरज असते. सकस आहारामुळे आपले शरीर तंदुरुस्त व मजबूत राहते. चांगला अभ्यास करण्याची तसेच कुठलेही व्यसन स्वत:ला लागणार नाही याचीही काळजी घेणे गरजेचे असते. आपण आपला विकास व प्रगती करून घेण्यासाठी अनेक प्रकारचे छंद जोपासावेत, खेळ व इतर कौशल्यांमध्येही सहभागी व्हावे. अशा प्रकारची काळजी आपण घेतल्याने आपला प्रत्येकाचा चांगला विकास होतो. तसेच मुलांनो, मुलगा असो किंवा मुलगी असो, आपला स्वत:चा विकास करून घेण्याची व स्वत:चे जीवन समृद्ध करण्याची समान संधी मिळवण्याचा पूर्ण हक्क सर्वांना मिळाला पाहिजे