वाढ आणि व्यक्तिमत्त्व विकास

आनुवंशिकता

views

2:48
वयाच्या १८ वर्षापर्यंत साधारणपणे आपली उंची वाढत असते. हे तुम्हांला माहीतच आहे. १८ वर्षे पूर्ण झाली की, आपली उंची वाढायची आपोआप थांबते. १८ वर्षापर्यंत वाढलेली उंचीच शेवटपर्यंत कायम राहते. तुमची उंची अजून वाढतच राहणार, कारण तुम्हांला अजून अठरा वर्षे पूर्ण झालेली नाहीत. परंतु तुमच्या आई-वडिलांच्या उंचीची वाढ मात्र थांबलेली आहे. मुलांनो, तुमच्या आसपास राहणारे, तुमच्या ओळखीतील १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे लोक आठवून पाहा. त्यातील सर्वांची उंची सारखीच असेल असे नाही. यातील काही जणांची उंची जास्त असेल, तर काही जणांची उंची कमी असेल. यावरून आपल्या लक्षात येते की आपण सर्वजण उंचीला एकसारखे नसतो. व्यक्ती - व्यक्तीनुसार उंचीत फरक असतो. आपले दिसणे, आपली अंगकाठी, आपले बोलणे, आपली चेहरेपट्टी यांसारखी अनेक शारीरिक लक्षणे साधारणपणे आपल्या आई वडिलांसारखी असतात. उदा: आपल्या आई वडिलांचे डोळे घारे असतील तर आपले किंवा आपल्या बहीण, भावाचे डोळे घारे असू शकतात. आपल्या आई वडिलांचे केस कुरळे असतील तर आपलेही असू शकतात. म्हणजेच मुलांनो एका कुटुंबातील लोकांमध्ये अनेक बाबतीत समानता दिसून येते. आपली काही लक्षणे आपले आजी-आजोबा, मामा-मावशी किंवा काका - आत्यांसारखी असतात. म्हणून कित्येक वेळा आपण ज्या व्यक्तींना ओळखत नसतो, आपण त्यांना व त्यांनी आपल्याला पाहिलेले नसते, असे लोकही घरातील लोकांच्यातील व आपल्यातील साम्य पाहून आपल्याला सहज ओळखतात. ते आपल्या आजोबांचे किंवा वडिलांचे नाव घेऊन त्यांचा नातू, त्याचा मुलगा आहेस ना? अशी विचारणा करतात. मुलांनो “आपल्या कुटुंबीयांसारखी आपल्यामध्ये जन्मत:च अनेक लक्षणे येणे, यालाच आनुवंशिकता असे म्हणतात.