मानवी स्नायू व पचनसंस्था

प्रस्तावना

views

4:19
आज आपण या पाठात मानवी स्नायू व पचनसंस्था याविषयी माहिती घेणार आहोत. इंद्रिय म्हणजे अवयव. मग आता सांगा इंद्रिय संस्था म्हणजे काय ? आपल्या शरीरात वेगवेगळी कार्ये वेगवेगळे अवयव किंवा इंद्रिये करतात. म्हणजेच आपल्या शरीरातील ठरावीक कामे एकत्रितरित्या पूर्ण करणाऱ्या इंद्रियांच्या गटाला ‘इंद्रिय संस्था’ म्हणतात. उदा. पचनसंस्था, स्नायुसंस्था, अस्थिसंस्था इत्यादी. आपल्या शरीरातील अवयवात हाडे असतात. आपल्या शरीरातील हाडे एकमेकांना कशी जोडलेली असतात आपल्या शरीरातील हाडे एकमेकांना सांध्यांनी जोडलेली असतात. त्यालाच अस्थिबंध असेही म्हणतात.