मानवी स्नायू व पचनसंस्था

स्नायूंचे कार्य

views

2:48
आपल्या शरीराची हालचाल होण्यासाठी स्नायू नेहमी गटाने काम करतात. गटातले स्नायू आलटून – पालटून आकुंचन आणि शिथिलीकरण पावतात. म्हणजेच एका स्नायूचे आकुंचन होते तेव्हा त्याच गटातील दुसऱ्या स्नायूंचे शिथिलीकरण होते. अशा पद्धतीने विविध शरीरक्रिया योग्य पद्धतीने चालू ठेवण्याचे काम स्नायू करीत असतात. आपल्या शरीरात वेगवगळ्या अवयवांत वेगवेगळे स्नायू आहेत आणि त्यांची नावेदेखील वेगवेगळी आहेत. आपल्या दंडामध्ये असलेल्या हाडांच्या वरच्या बाजूला असलेल्या स्नायूला द्विशिरस्क स्नायू म्हणतात. तसेच आपल्या दंडामध्ये असलेल्या हाडांच्या खालच्या बाजूला असलेल्या स्नायूंना त्रिशिरस्क स्नायू म्हणतात. अवकुंचनी स्नायू आपल्या हालचालींचे नियंत्रण व संचलन करतात. हे स्नायू मुख्यत्वे करून हाताच्या पायाच्या भागात असतात. आणि चतु:शिरस्क स्नायू हा आपल्या शरीरातील सर्वात मोठा व लांब स्नायू आहे. या स्नायूचा उपयोग चालणे, उड्या मारणे, उठाबश्या काढणे यासाठी होतो. अशाप्रकारे विविध स्नायू विविध कार्ये करतात.