मानवी स्नायू व पचनसंस्था

पचनसंस्था

views

2:51
आपल्या शरीरात पचनसंस्था आहे. आपण खाल्लेले अन्न या पचनसंस्थेमध्ये जाते व त्याचे संपूर्ण पचन होते. या पचनसंस्थेत अन्नाचे पचन होत असताना अन्नापासून पोषणद्रव्ये तयार केली जातात. आपण नेहमी ‘अन्नपचन होणे’ हा शब्द ऐकतो. अन्नपचन म्हणजे आपण जे अन्न खातो त्याचे रूपांतर विद्राव्य घटकांत होणे आणि ते रक्तात मिसळणे यालाच ‘अन्नपचन’ असे म्हणतात. अन्नपचन क्रिया आपल्या शरीरात असलेल्या पचनसंस्थेद्वारे होते. पचनसंस्था ही वेगवेगळ्या इंद्रियांनी बनलेली असते. पचनसंस्थेतील ही वेगवेगळी इंद्रिये अन्न पचनाचे काम पद्धतशीरपणे करत असतात. अन्नपचनाच्या क्रियेचे देखील वेगवेगळे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यांवर कामे करणारी पचनेंद्रिये वेगवेगळी आहेत. विशिष्ट टप्प्यांवर ती-ती इंद्रिये त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडतात. पचनसंस्थेमध्ये अन्ननलिका व पाचकग्रंथी यांचा समावेश असतो. आपल्या शरीरातील अन्ननलिकेची लांबी एकूण नऊ मीटर असते. अन्ननलिकेत प्रामुख्याने मुख/तोंड, ग्रसनी, ग्रासिका, जठर/आमाशय, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुदद्वार यांचा समावेश असतो. तसेच लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचक ग्रंथी अन्ननलिकेशी ठरावीक ठिकाणी जोडलेल्या असतात. ही सगळी इंद्रिये आपल्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी असून त्यांची कार्ये देखील वेगवेगळी आहेत.