मानवी स्नायू व पचनसंस्था

माहीत आहे का तुम्हाला?

views

2:23
तुम्हाला माहीत आहे का, मानवी शरीरात 600 पेक्षा अधिक स्नायू असतात. प्रौढ, निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या सुमारे 40 % वजन हे स्नायूंचे असते. तसेच आपल्या चेहऱ्याच्या भागात जवळपास 30 स्नायू असतात. या स्नायूंच्या हालचालींमुळेच आपल्या चेहऱ्यावर दु:ख, आंनद, भीती असे अनेक भाव दिसतात. आपले तोंड, डोके, नाक यांच्याभोवती छोट्या स्नायूंची वर्तुळे असतात. या स्नायूंमुळे आपल्या चेहऱ्यावर विविध भाव दिसतात. जसे लोकांच्या मानसिकतेच्या अभ्यासशास्त्राला (सायकॉलॉजी), म्हणतात. तसे स्नायूंच्या अभ्यासशास्त्राला Myology (मायॉलॉजी) असे म्हणतात. आपल्या शरीरातील सर्वात मोठा स्नायू मांडीमध्ये असतो. तसेच सर्वात लहान स्नायू हा कानातील स्टेपस या हाडाला जोडलेला असतो. आपल्या शरीराची वाढ होते तशीच वाढ या स्नायूंची देखील होत असेल. शरीराच्या वाढीसाठी आपण जशी काळजी घेतो तशीच काळजी आपल्या स्नायूंची देखील घ्यावी लागते. आपल्या शरीरातील स्नायू बळकट आणि सतत कार्यरत असणे आवश्यक असते. स्नायूंच्या वाढीसाठी आणि झीज भरून काढण्यासाठी आपल्या आहारात प्रथिनयुक्त व पिष्टमय पदार्थ असणे खूप गरजेचे असते. पिष्टमय पदार्थ म्हणजे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी आणि बटाटा, रताळी, सुरण अशी कंदमुळे आणि प्रथिने देणारे पदार्थ म्हणजे कडधान्ये व डाळींचे प्रकार, अंडी, बदाम, आक्रोड, मांस व मासे.