मानवी स्नायू व पचनसंस्था

ऐच्छिक स्नायू आणि अनैच्छिक स्नायू

views

3:19
आपल्या शरीरात ऐच्छिक स्नायू आणि अनैच्छिक स्नायू असतात. त्यांचे काम कशाप्रकारे होते ते पाहू. ऐच्छिक स्नायू: ऐच्छिक स्नायू हे इच्छेवर अवलंबून असणाऱ्या कामांसाठी वापरतात. म्हणजेच हातांनी काम करणे, अन्नपदार्थ खाणे, चालणे अशी कामे आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. या कामांसाठी वापरात येणाऱ्या स्नायूनांच ऐच्छिक स्नायू असे म्हणतात. आपल्या शरीरात हे ऐच्छिक स्नायू हात आणि पाय या अवयवांत आहेत.अनैच्छिक स्नायू: मुलांनो, शरीरातील सगळेच अवयव आपल्या इच्छेनुसार काम करीत नाहीत. आपल्या शरीरातील काही इंद्रियांची कामे ही जीवनावश्यक असतात. पण ती आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. अशा इंद्रियात असणाऱ्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. जठर, आतडे, हृदय अशा अवयवांची कामे ठरावीक पद्धतीने अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने होत असतात. म्हणजेच श्वसन, पचन, रक्ताभिसरण ह्या आपल्या जीवनावश्यक क्रिया आहेत, पण त्या आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. म्हणून या क्रिया करणाऱ्या अवयवांमध्ये जे स्नायू आहेत ते अनैच्छिक स्नायू असतात. स्नायूंचे प्रकार: मुलांनो, अस्थी स्नायू, हृदयाचे स्नायू आणि मृदू स्नायू हे स्नायूंचे प्रकार आहेत. अस्थी स्नायू: दोन वेगवेगळ्या हाडांना जोडलेल्या स्नायूंना अस्थी स्नायू असे म्हणतात. हे स्नायू आपल्या इच्छेनुसार चालतात म्हणून त्यांना ऐच्छिक स्नायू असेही म्हणतात. अस्थी स्नायू हाडांचा सांगाडा एकत्र ठेवतात आणि शरीराला आकार देतात. उदा. हातांचे, पायांचे स्नायू.हृदयाचे स्नायू: हृदयातील स्नायू सतत कार्यरत राहिले पाहिजेत. हे स्नायू अविरतपणे हृदयाचे आकुंचन व शिथिलीकरण घडवून आणतात. हे स्नायू आपल्या इच्छेनुसार कार्य करीत नाहीत म्हणून त्यांना अनैच्छिक स्नायू म्हणतात.मृदू स्नायू: आपण जिवंत असेपर्यंत अविरतपणे शरीराची अनेक जीवनावश्यक कार्ये आपल्या नकळत हे स्नायू करीत असतात. शरीरातील ज्या ज्या आंतरेंद्रियांची हालचाल अनैच्छिक असते अशा ठिकाणी असणाऱ्या स्नायूंना मृदू स्नायू म्हणतात. उदाहरणार्थ जठर, आतडे, रक्तवाहिन्या, गर्भाशय इत्यादी अवयवांच्या ठिकाणी मृदू स्नायू आढळतात.