मानवी स्नायू व पचनसंस्था

पचनसंस्थेतील महत्त्वाच्या ग्रंथी व त्यांचे कार्य:

views

5:09
आता आपण पचनसंस्थेतील महत्त्वाच्या ग्रंथी व त्यांचे कार्य पाहू. 1) लाळग्रंथी: ही ग्रंथी तोंडात असते. लाळेत टायलीन नावाचे विकर असते. लाळेमुळे पिष्टमय पदार्थांचे रूपांतर माल्टोजमध्ये होते. 2) जठर भित्तिका: जठर भित्तिका म्हणजे जठराच्या आतील भिंती. त्यातून जाठरस पाझरतो. जाठरसात हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, आणि म्युकस म्हणजेच श्लेष्म असते. जाठरसामुळे अन्न आम्लयुक्त बनते. प्रथिनांचे विघटन होते. श्लेष्मामुळे जठराच्या अस्तराचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून रक्षण होते. 3) यकृत: यकृतातून पित्तरस पाझरतो. पित्तरसामुळे अन्न आम्लारीयुक्त बनते. तसेच मोठ्या मेदकणांचे लहान कणांत रूपांतर होते. 4) स्वादुपिंड: स्वादुपिंडातून स्वादुरस पाझरतो. त्यात ट्रिप्सिन, लायपेज, अमायलेज यांसारखी विकरे असतात. यामुळे प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात होते. पिष्टमय पदार्थांचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते. आणि मेदाचे मेदाम्लात व ग्लिसेरॉल मध्ये होते. तर अशी ही ग्रंथींची विविध कार्ये आहेत.