स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व Go Back प्रस्तावना views 3:32 ब्रिटिश सरकारने हिंदी लोकांना सुधारणांचा पहिला हप्ता इ.स. १९१९ च्या कायद्याने दिला. हा हप्ता हिंदी लोकांना आणि त्यांच्या नेत्यांना अपुरा व असमाधानकारक वाटला आणि म्हणूनच या सुधारणांवर समाधान न मानता त्यांनी आपल्या राष्ट्रीय चळवळी चालूच ठेवल्या. १९२० ची महात्मा गांधीजींची असहकार चळवळ, इ.स.१९२७ – २८ ची सायमन कमिशन विरोधी चळवळ, इ.स.१९३०-३४ च्या दरम्यान झालेली सविनय कायदेभंगाची चळवळ, अशी अनेक राष्ट्रीय आंदोलने आपण मागील पाठांमध्ये पाहिली. इ.स. १९१९ चा कायदा प्रसिद्ध झाल्यापासून तो आम्हांला पसंत नाही, तो सुधारला जावा, म्हणून हिंदी लोकांची मागणी होती. पण सरकार काही लगेच त्यात सुधारणा करणार नव्हते. अनेक आंदोलने केल्यानंतर १९३५ मध्ये सरकारने पूर्वीच्या कायद्यात सुधारणा करून १९३५ चा कायदा आणला. त्याची माहिती आता आपण करून घेणार आहोत. प्रस्तावना क्रिप्स योजना छोडो भारत चळवळ चला जाणून घेऊया प्रतिसरकारांची स्थापना आझाद हिंद सेना आझाद हिंद सेनेचा पराक्रम भारतीय नौदल व विमान दलातील उठाव