स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व Go Back छोडो भारत चळवळ views 4:40 क्रिप्ससाहेब भारतातून निघून गेले. त्यांची क्रिप्स योजना म्हणजे हिंदी लोकांची फसवणूक होती. जगाच्या, विशेषतः अमेरिकेच्या दबावाखाली चर्चिलने ही योजना जाहीर केली असली तरी चर्चिलला हिंदुस्थानला स्वातंत्र्य द्यायचे नव्हते. ही बाब राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांच्या लक्षात आली होती. त्यामुळे राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वातंत्र्याची चळवळ आणखी तीव्र व प्रखर करण्याचा निर्धार केला. महाराष्ट्रातील वर्धा येथे १४ जुलै १९४२ रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव संमत केला. ही मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रीय सभा भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक चळवळ सुरू करेल, असा इशाराही इंग्रज सरकारला देण्यात आला. प्रस्तावना क्रिप्स योजना छोडो भारत चळवळ चला जाणून घेऊया प्रतिसरकारांची स्थापना आझाद हिंद सेना आझाद हिंद सेनेचा पराक्रम भारतीय नौदल व विमान दलातील उठाव