समतेचा लढा Go Back दलित चळवळ views 4:01 आपल्याला माहीत आहे, की भारतीय समाजरचना ही जातिव्यवस्थेवर आधारलेली होती. यात सर्वात उच्च ब्राह्मण, नंतर क्षत्रिय, नंतर वैश्य व शेवटी शुद्र म्हणजे दलित अशी ही रचना होती. दलितांना सर्वात खालचा दर्जा दिला जात असे. त्यांचा जन्म जणू वरील तीन वर्गांची सेवा करण्यासाठी झाला आहे असे समजले जात असे. समाजात दलितांवर अनेक प्रकारचे जुलूम, अन्याय होत असत. दलितांना मिळणाऱ्या अन्यायकारक वागणुकीविरुद्ध समाजसुधारकांनी लोकांच्यात जागृती निर्माण केली. अशा अस्पृश्य, दलित लोकांचा उद्धार व्हावा यासाठी महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज व डॉ. आंबेडकर यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. महात्मा फुले यांच्या शिकवणीला अनुसरून गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. प्रस्तावना कामगार संघटन समाजवादी चळवळ स्त्रियांची चळवळ दलित चळवळ राजश्री शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर