समरूपता

प्रस्तावना

views

3:26
a आणि b या दोन संख्यांचे गुणोत्तर m/n आहे; हेच विधान a आणि b या दोन संख्या m:n (एमास एन) या प्रमाणात आहेत असे लिहतात. या संकल्पनेसाठी आपण सामान्यपणे धन वास्तव संख्येचा विचार करतो. रेषाखंडाची लांबी आणि एखादया आकृतीचे क्षेत्रफळ या धन वास्तव सख्या असतात. आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा अभ्यास केला आहे. त्याचे सूत्र 1/2 पाया x उंची आहे. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर: आता आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर कसे काढतात याविषयी अभ्यास करणार आहोत. यावरून आपल्या असे लक्षात येते की समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात.