समरूपता Go Back कृती 1 views 4:31 आता आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराच्या गुणधर्मावर आधारित काही उदाहरणे सोडवूया. उदा:2 ∆ABC च्या बाजू BC वर बिंदू D असा घ्या की, DC=6, BC=15 असेल. त्रिकोण ABD च्या क्षेत्रफळासास त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ A(∆ABD):A(∆ABC) आणि त्रिकोण ABD च्या क्षेत्रफळासास त्रिकोण ADC चे क्षेत्रफळ A(∆ABD):A(∆ADC) काढा. (पान क्र. 3, आकृती 1.10.) उकल: ∆ABD, ∆ADC, आणि ∆ABC या तिन्ही त्रिकोणांचा A हा सामाईक शिरोबिंदू आहे. आणि त्यांचा पाया एका रेषेत आहे. म्हणून या तीनही त्रिकोणांची उंची समान आहे. BC=15 व DC=6. ∆BDC सरळ रेषेत आहे. जर BD चे माप काढायचे असेल तर BC मधून DC ची लांबी वजा करावी लागेल. ∴ BD = BC - DC = 15 – 6 = 9 ∆ABD व ∆ABC या दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे. म्हणून क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात असेल. प्रस्तावना कृती 1 उदाहरण 3 (समान क्षेत्रफळांच्या त्रिकोणांच्या दोन जोडया) प्रमाणाचे मुलभूत प्रमेय त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोटया व त्यांचे गुणधर्म समरूप त्रिकोणांची को-को (कोन-कोन) कसोटी: उदाहरण 3 (सर्व कसोटयांवर आधारित उदाहरणे) समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय