समरूपता

समरूप त्रिकोणांची को-को (कोन-कोन) कसोटी:

views

4:08
शिरोबिंदुच्या एखादया एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोन जर दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोनांशी एकरूप असतील, तर पहिल्या त्रिकोणाचा उरलेला कोन हा दुसऱ्या त्रिकोणाच्या उरलेल्या कोणाशी एकरूप असतो. म्हणजेच एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोनांशी एकरूप असतील तरीही ही अट दोन त्रिकोण समरूप होण्यासाठी पुरेशी असते. यावरून एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात या गुणधर्माला समरुपतेची को-को कसोटी म्हणतात. समरूपतेची बाकोबा कसोटी (बाजू-कोन-बाजू): दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदुच्या एखादया एकास एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूच्या दोन जोडया एकाच प्रमाणात असतील आणि त्यांनी समाविष्ठ केलेले कोन एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. समरूपतेची बा-बा-बा (बाजू-बाजू-बाजू) कसोटी: दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एखादया एकास एक संगतीत जेव्हा एका त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी एकाच प्रमाणात असतात तेव्हा ते त्रिकोण समरूप असतात. या गुणधर्माला बाबाबा कसोटी म्हणतात.