उष्णता

पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता काढण्याचे सूत्र

views

4:09
उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाण - घेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होते व थंड वस्तूचे तापमान वाढते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते. तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करून तापमान वाढवते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात. अशा स्थितित असल्यास म्हणजेच जर दोनही वस्तूंची प्रणाली (System) वातावरणापासून वेगळी केल्यास म्हणजेच उष्णतारोधक पेटीत ठेवल्यास पेटीतून उष्णता बाहेरही जाणार नाही आणि बाहेरून उष्णता आतही येणार नाही. अशा स्थितीत आपणांस उष्णता विनिमयाचे तत्व मिळते.पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेचे मापन मिश्रण पद्धतीने करता येते. यासाठी कॅलरीमापी या उपकरणाचा उपयोग करतात. उष्णता दिलेला स्थायू पदार्थ कॅलरीमापीतील पाण्यात टाकला असता, उष्ण स्थायू पदार्थाकडून कॅलरीमापीतील पाणी व कॅलरीमापी यांच्यात उष्णता स्थानांतरणाची क्रिया चालू होते. स्थायू पदार्थ, पाणी व कॅलरीमापी यांचे तापमान समान होईपर्यंत उष्णता स्थानांतरणाची क्रिया चालू राहते.